धुळ्यात हळदीच्या कार्यक्रमात हाणामारी

0

धुळे । देवपूरातील वाडीभोकर रोडवर काल रात्री हळदीच्या कार्यक्रमात हाणामारीचा प्रकार घडला. रविंद्र गोपाल कोरे (30) या तरूणाला चौघांनी तलवार, फाईट, दांड्याने जबर जखमी केले. यावर समजलेल्या माहितीनुसार वाडीभोकर रोडवरील सैलानी कॉलनीत काल रात्री हळदीचा कार्यक्रमात रविंद्र गोपाल कोरे (रा. उस गल्ली, राजकमल टॉकीज मागे) हा तरूण सहभागी झाली होता. त्याचा यावेळी तिघा-चौघा तरूणांशी वाद झाला. या वादातून त्या तरूणांनी रविंद्र कोरेवर हल्ला चढवला. तलवार, फाईट, लाकडी दांडग्याने त्यास बेदम मारहाण करण्यात आली. जखमी झालेल्या रविंद्रला रात्री 10.30 वाजता पप्पू विभुते याने जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या हाणामारी प्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.