एकास चाळीसगाव पोलिसांनी घेतले ताब्यात
धुळे :- शहरातील मालेगाव रोडवरील हॉटेल सम्राटमध्ये जेवणाच्या बिलावरून वाद वाढल्याने एकाने वेटरवरच गावठी कट्टा रोखल्याने खळबळ उडाली. रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. समजलेल्या माहितीनुसार, हॉटेल सुपर सम्राट येथे जेवणाच्या वादातून संशयीत आरोपी रवींद्र मोरे (चितोड) याने वेटरवरच गावठी कट्टा रोखला.
या प्रकारानंतर हॉटेलमधील ग्राहक व कर्मचारी भांबावले. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सतीश सपकाळे व कर्मचार्यांनी लागलीच धाव घेत मोरे यास ताब्यात घेतले. शहरात शांतता गोळीबार झालेला नाही, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी केले आहे.