चोरट्यांची दिवाळी तर बँकेचे दिवाळे ; भल्या पहाटे दोघा चोरट्यांचे कृत्य
धुळे- पोलिसांच्या गस्तीचे वाहन गेल्यानंतर अवघ्या काही मिनिटात चोरट्यांनी शहरातील मालेगाव रोडवरील रामवाडी परीसरातील आयसीआयसीआय बँकेचे चक्क एटीएम मशीन लांबवले. विशेष म्हणजे या एटीएममध्ये सुमारे 22 लाख 28 हजारांची रोकड असल्याने चोरट्यांची दिवाळी झाली तर बँकेला मात्र बँकेला दिवाळीतच आर्थिक फटका सोसावा लागला. बँकेच्या सीसीटीव्हीत चोरट्यांची छवी कैद न होण्यासाठी चोरट्यांनी सुरुवातीला एटीएम बाहेर लावलेल्या सीसीटीव्हीच्या वायरी कट करून शनिवारी पहाटे 3.50 वाजेच्या सुमारास चोरी केली व एटीएम मशीन पीकअप वाहनाद्वारे घेवून पोबारा केला. या घटनेने धुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गेल्या दहा महिन्यांपूर्वी जळगाव जिल्ह्यातदेखील अशाच पद्धत्तीने गॅस कटरच्या सहाय्याने तीन एटीएम फोडल्याच्या घटना घडल्या होत्या तर हरीयाणातील टोळीवर पोलिसांनी संशय व्यक्त केला असलातरी अद्यापही या गुन्ह्याचा उलगडा करण्यास यंत्रणेला यश आलेले नाही, हेदेखील विशेष !
पोलिसांच्या गस्तीनंतर लांबवले एटीएम
वर्दळीच्या मालेगाव रोडवरील आस्था हॉस्पीटलसमोर आयसीआयसीआय तसेच एचडीएफसी बँकेचे एटीएम आहे. दिवाळीनिमित्त दररोज ग्राहकांकडून पैसे काढले जात असल्याने बँकेकडून सातत्याने या एटीएममध्ये ग्राहक सुविधेसाठी पैसे भरले जात आहेत. शुक्रवारीदेखील या एटीएममध्ये पाच लाखांची रोकड भरण्यात आली. शनिवारी पहाटे 3.50 वाजेच्या पाच मिनिटे आधी पोलिसांचे गस्ती वाहन या भागातून गेल्यानंतर बोलेरा पीकअप वाहनातून आलेल्या चोरट्यांनी आधी एमटीएमबाहेरील सीसीटीव्हीच्या वायरी कापत आत प्रवेश केला. सुरुवातीला एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यात यश न आल्याने चोरट्यांनी वाहनात एटीएम मशीन टाकून लांबवले. या एटीएममध्ये सुमारे 30 लाखांपर्यंत रोकड असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले तर बँकेकडून याबाबत
घटना उघडकीस येताच पोलिसांची धाव
पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास एका चहा विक्रेत्याला बँकेचे एटीएम लांबवण्यात आल्याची माहिती कळताच त्याने पहाटे फिरणार्यांना याबाबत माहिती दिली तर या काही वेळात पोलिसांना माहिती कळवण्यात आल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपअधीक्षक सचिन हिरे, शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पोलिस ताफा घटनास्थळी धडकला. ठसे व श्वान तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानाने काही अंतरापर्यंत माग दाखवला मात्र नंतर श्वान घुटमळले.