धुळ्यात 67 हजारांची बनावट दारू पकडली : दोघांविरोधात गुन्हा
मुख्य संशयीत पसार ः धुळे शहर पोलिसांची गोपनीय माहितीवरून कामगिरी
धुळे : धुळे शहरातील विद्युत नगर, नमो डेअरीमागे बनावट दारूची निर्मिती करून त्याची विक्री होत असल्याची माहिती धुळे शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सोमवार, 25 रोजी छापा टाकत 57 हजार 600 रुपये किंमतीचे 20 दारूचे बॉक्स, सहा हजार 600 रुपये किंमतीच्या 180 एमएल मापाच्या रीकाम्या बाटल्या, दोन हजार रुपये किंमतीचे बूच, 720 रुपये किंमतीच्या पाण्याच्या बाटल्या व 35 हजार क्षमतेचे दोन कॅन असा एकूण 67 हजार 120 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संशयीत मयूर मच्छिंद्र शार्दूल हा पसार असून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक दिनकर पिंगळे, धुळे शहर निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक दादासाहेब पाटील, उपनिरीक्षक कैलास दामोदर, हवालदार विलास भामरे, हवालदार मुक्तार मन्सुरी, शिपाई मनीष सोनगीरे, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, विवेक साळुंखे, अविनाश कराड, गौरव देवरे, तुषार मोरे, गुणवंत पाटील, शाकीर शेख, चालक मोरे, सुशीला वळवी आदींच्या पथकाने केली.