Attack on Pantapari driver in Punkheda village रावेर : तालुक्यातील पुनखेडा येथे धूळ का उडवली? असे विचारल्याचा राग आल्याने पानटपरी चालकावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. ही घटना गुरुवार, 17 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एकाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
लोखंडी आसारीने केली मारहाण
तक्रारदार ललित नामदेव सपकाळे (32, पूनखेडा) हे पानटपरी चालक असून संशयीत सदाशीव मधुकर सपकाळे (पूनखेडा) यांच्यात धूळ का उडवली? या कारणावरून वाद झाला. सदाशीव यांनी ललित यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच डाव्या पायाच्या बोटावर लोखंडी आसारीने मारहाण करीत बोट फ्रॅक्चर करून दुखापत करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तपास हवालदार अर्जुन सोनवणे करीत आहेत.