धोकादायक रोहित्र इतरत्र हलविण्याची मागणी

0

नवापूर : नवीन महादेव मंदीर परिसरात आपल्या विद्युत मंडळाचे डीपी व पोल असून पिंपळाच्या झाडाजवळ असल्याने मंदीरात आलेल्या भाविकांना पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारतांना विजेचा करंट लागून जीवीतहानी होण्याची भीती निर्माण होते. तसेच हया परिसरात नेहमी लहान मुलांचा वावर असुन सदर परिसराशिवाय त्यांना खेळण्यासाठी इतरञ जागा नसल्याने मंदीर परिसरातच खेळतात. यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. नवापूर शहरातील नवीन महादेव भागातील नागरिकांनी वीजवितरण कंपनी कार्यालयात जाऊन वीज अभियंता राकेश गावीत यांना निवेदन दिले.

करंट लागून गायीचे वासरू मरण पावले

निवेदनामध्ये म्हटले आहे की मागील वर्षी सदर रोहीत्राचा करंट लागून गायीचे वासरू मरण पावले आहे.त सेच सदर परिसरात दुचाकी वाहनांची नेहमी वर्दळ असते. डीपी लावलेली जागा ही मुख्य रस्त्याच्या वळणावर असल्याने तेथे मोटर सायकल डीपीवर आदळली जाऊन अपघात झालेला आहे. यामुळे अपघात टाळण्यासाठी लवकरात लवकर मंदीर परिसरातील विदयुत रोहित्र व पोल इतरञ सुरक्षित जागेत स्थलांतरीत करावी. जेणेकरुन परिसरातील नागरिक बालक व मंदीरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना धोका होणार नाही. निवेदन देते वेळी मनोज अग्रवाल, महेंद्र दुसाने, हिमांशू पाटील, अविनाश हिरे, दर्शन पाटील, विशाल पाटील, दुर्गेश पाटील, संदिप पाटील, अमित पाटील, भुषण पाटील, अक्षय पाटील, अजिंक्य पाटील, ऋषिकेश पाटील, जगदीश जयस्वाल, अनिल दुसाने, आकाश भोई, राकेश भोई, संदिप राणा, जितेंद्र मोरे आदी उपस्थित होते.