धोका अथवा अपघात टाळण्यासाठी विधिमंडळ परिसरातील विद्युत पुरवठा बंद-चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर : विधिमंडळ परिसरात काल रात्रीपासून प्रचंड पाऊस सुरु असल्याने सभागृहाला विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत गृहाजवळ मोठ्या प्रमाणात बॅक वॉटर आले. विद्युत गृहात पाणी शिरुन काही धोका अथवा अपघात होऊ नये, म्हणून एका तासासाठी विद्युत पुरवठा बंद करण्यात आल्याचे निवेदन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत केले.