धोनीचे बाइकप्रेम विलक्षण – जडेजा

0

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला बाइकचे वेड आहे. धोनीप्रमाणेच सर रवींद्र जडेजालादेखील बाइक चालवायला आवडते. मात्र, धोनीच्या बाइकप्रेमापुढे आपण काहीही नाही असे सांगत धोनीलादेखील त्याच्याकडे किती गाड्या आहेत याची माहिती नसल्याचे जडेजाने सांगितले.

जडेजा म्हणाला की, धोनीकडे खूप बाइक्स आहेत. इतक्या की स्वत: धोनीलाही आकडा माहीत नाही. त्याला किती बाइक्स आहेत असे विचारले असता 43-44 बाइक्स असतील, असे त्याने सांगितले होते. अनेक बाइक्स त्याने चालवल्याही नाहीत, असे जाडेजा म्हणाला. धोनी तिन्ही फॉरमॅटमधील क्रिकेट खेळायचा, तेव्हा बाइक चालवण्यासाठी वेळ नसायचा. जेव्हा त्याने कसोटी क्रिकेटमधून राजीनामा दिला आहे, तेव्हापासून त्याला बाइक चालवायला मिळत असल्याचे जडेजाने सांगितले.