धोनीच्या विक्रमाशी ऋषभ पंतने केली बरोबरी

0

नवी दिल्ली : कसोटी मालिकेत पहिल्या डावात सहा झेल घेण्याचा विक्रम माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नावावर होता. मात्र, आता या विक्रमाशी यष्टीरक्षक ऋषभ पंतने बरोबरी केली असून त्याने नेत्रदीपक यष्टीरक्षण करत ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ब्रॅड हेडनच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पंतने जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर मिचेल स्टार्कचा झेल घेतला. त्यानंतर त्याने ट्रॅव्हिस हेड आणि जोश हॅझलवूडचा झेल घेत हा विक्रम प्रस्थापित केला. याआधी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने उस्मान ख्वाजा, पीटर हँड्सकोम्ब आणि आस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन यांचा झेल घेतला होता. ख्वाजाला रवीचंद्रनने तर इतर दोघांना मोहम्मद शमी आणि इशांत शर्माने बाद केलं होतं.

महेंद्र सिंह धोनीने २००९मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टन कसोटीतील पहिल्या डावातच हा विक्रम प्रस्थापित केला होता. तर ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅड हेडनने २०१४ मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात सहा झेल घेतले होते.