धोनी खेळणार 2019 चा विश्‍वचषक

0

मुंबई। महेंद्रसिंह धोनी याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर एकदिवसीय संघाचे कर्णधार पदही सोडल्याने अनेक चर्चाना उधाण आले होते.त्यामुख्य चर्चा होती ती त्याच्या फॉर्म बद्दल.त्याला फॉर्म गवसलेला नाही,त्यामुळे तो आगामी विश्‍वचषकाच्या संघात राहणार की नाही यावर चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चे सुरू असतांना भारताचा माजी सलामीवीर सेहवाग धोनीच्या पाठिमागे उभा राहिला आहे. वीरेंद्र सेहवाग आपल्या व्टिट मुळे अनेकवेळा चर्चेत राहत असतो.

त्याच्याबरोबर तो कोव्हा काय व्यक्तव्य करेल हे सांगता येत नाही. धोनी विश्‍वचषक खेळणार की नाही यावर चर्चेचा रंगल्या असतांना धोनीच्या पाठिमागे सेहवाग उभा राहिला आहे.त्याने एका कार्यक्रमात बोलतांना म्हणाला की, धोनी विश्वचषकासाठीच्या संघात नक्की असेल. असा विश्वास सेहवागने व्यक्त केला आहे.सध्या बीसीआयकडून भारतीय संघासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु आहे. यामध्ये सेहवागचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे सेहवागच्या या वक्तव्याला फार महत्व आहे.मागील वर्षभरापासून धोनीला आपला फॉर्म गवसलेला नाही. पण तरीही सेहवागने धोनीची पाठराखण केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध कर्णधार कोहलीनं धोनीच्या आधी हार्दिक पंड्याला फलंदाजीसाठी बोलावले. त्याच्या या निर्णयाने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण पंड्याने शेवटच्या ओव्हरमध्ये तीन चेंडूंत तीन षटकार ठोकले होते.