धोबी समाजातील गुणवंतांचा सत्कार

0

जळगाव- जळगाव जिल्हा धोबी समाज सेवा मंडळ व जळगाव जिल्हा धोबी समाज शिक्षक व शिक्षकेतर बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा केमिस्ट भवन येथे पार पडला. यात समाजातील सुमारे १७२ गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी गुणगौरव सोहळ्यात अध्यक्षस्थानी जिल्हा परिट धोबी सेवा मंडळाचे अध्यक्ष अरुण शिरसाळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक गणेश सोनवणे, नगरसेविका सुरेखा सोनवणे, शिवछत्रपती पुरस्कार्थी अशोक चौधरी, संत गाडगेबाबा युवा फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र जाधव,राज्य धोबी सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष एकनाथराव बोरसे, भारतीय धोबी महासंघाचे कार्यकारी सदस्य दिलीप शेवाळे, धोबी सेवा मंडळाचे उपाध्यक्ष विठ्ठल सोनवणे, जिल्हा लॉन्ड्री व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अरूण राऊत, बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, डेबूजी फोर्सचे अध्यक्ष सागर सपके, धोबी समाज आरक्षण समितीचे राज्य अध्यक्ष विवेक ठाकरे, भास्कर महाले, जगन्नाथ बाविस्कर, दीपक शिरसाळे आदींची उपस्थिती होती़ संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून सोहळ्याला सुरूवात करण्यात आली. प्रारंभी संजय क्षिरसागर यांनी स्वागतगीत व महाराष्ट्र गीत सादर केले.

यानंतर दहावी, बारावी, पदवी, पदविका तसेच पदव्युत्तर, क्रीडा, व्यावसायिक अभ्यासक्रमातील १७२ गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यासोबतच पीएसआय मनोहर जाधव, पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त माणिक सपकाळे, राज्य औद्यागिक वसाहत संघावर निवडून आलेले संजय पवार, सिनेसृष्टीतील कुणाल जाधव, आंतरराष्ट्रीय खेळाडू उमाकांत जाधव, स्नॅप शुटर अनिकेत वाघ, विधी पदवी घेतलेले ज्ञानेश्वर सूर्यवंशी, बीपीई प्रथम मनोज वाघ, बीडीएस उत्तीर्ण प्रणिता जाधव, एमटेक प्रथम मिताली शेवाळे, एमबीए प्रथमी श्रेणीत आलेला निखील ठाकरे, बीटेक प्रथम श्रेणीतील उत्तीर्ण वर्षा सपकाळे, बीटेक प्रथम श्रेणीतील कोमल कापसे, दहावीत ९७ टक्के गुण प्राप्त डिंपल बोरसे, ९२़३० टक्के गुण मिळविणारी वैष्णवी सपके, गणितात शंभर पैकी शंभर गुण मिळविणारा हिमांशु चांदेलकर, ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आलेल्या सुरेखा सोनवणे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.