धुळे । धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती पुर्ववत लागु करण्यासाठी केंद्र सरकारला मुख्यमंत्र्यांतर्फे साकडे घालण्यात आले असून यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना निवेदनही देण्यात आले आहे. 1960 ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या घटनेमध्ये धोबी जात अनुसूचित जातीत होती. आज भारतात 17 राज्यामध्ये धोबी जातीला अनुसूचीत जातीची सवलत मिळते. आज महाराष्ट्रामध्ये 35 लाख धोबी समाजातील नागरिकांना अनुसूचित जातीच्या सवलतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे.विधानसभेत विरोधी पक्ष आमदार असतांना मुख्यमंत्र्यांनी समर्थनही दिले होते. परंतू आज स्वतः मुख्यमंत्री असल्यावर या विषयाला वाचा फोडली जात नाही. गेल्या 60 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीची पूर्तता करुन धोबी समाजावर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर प्रदेश युवा अध्यक्ष संजय वाल्हे, सुनिल खैरनार, पंडीतराव जगदाळे, जितेंद्र पवार, सुनिल सपकाळ, अनिल काकुळदे, योगेश खैरनार, सुनिल बाबा खैरनार, दिपक कापडे, शैलेश पवार, वासुदेव महाराज, गुलाबराव सोनवणे, भोला सगरे आदींच्या सह्या आहेत.