शिरपूर । येथील धोबी समाजाचे सक्रीय कार्यकर्ते अरुण सुकलाल यांची धोबी (परिट) समाज सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्षपदी निवड जाहिर करण्यात आली आहे. अखिल भारतीय धोबी महासंघ राष्टीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे यांचा मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार यांनी अरुण धोबी यांची प्रदेश उपाध्याक्षपदी निवड जाहिर केली. प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार यांचा अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे यांचा प्रमुख उपस्थित रविवार 13 मे रोजी समाजाची प्रदेश बैठक चिपळुण जिल्हा रत्नागिरी येथे झाली.
धोबी यांनी भुषविली विविध पदे
नुकतेच नाशिक येथे प्रदेश अधिवेशनात प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र यशवंतराव खैरनार(नाशिक) यांची निवड झाली होती. यानंतर प्रदेश पदाधिकारी, कार्यकारणी जाहिर करण्यासाठी प्रथमच प्रदेश बैठक झाली.या कार्यकारणीत धुळे जिल्हातुन एकमेव अरुण धोबी यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड जाहिर करण्यात आली. अरुण धोबी यांनी आतापर्यंत समाजाचे शिरपुर शहर सरचिटणीस,विभागीय युवक उपाध्यक्ष,जिल्हा उपाध्यक्ष आदी पदांवर काम केले आहे. समाजाचे सुकाणु समिती प्रदेशाध्यक्ष किसनराव जोर्वेकर,प्रदेश महासचिव सुधीर पाटोळे,तंटामुक्ती समिती प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी,युवक प्रदेशाध्यक्ष संतोष भालेकर,महिला प्रदेशाध्यक्षा सौ.कल्पनाताई गायकवाड यांचासह राज्यभरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अरुण धोबी यांच्या या निवडीने सर्वत्र अभिनंदन होत आहे.