ध्येय गाठण्यासाठी शिस्तीच्या मार्ग अवलंबा – पो.नि. सोनवणे

0

धरणगाव । राष्ट्रीय छात्रसेनेत शिस्तीचे धडे दिले जातात युनिफॉर्मचे आर्कषण विद्यार्थ्यांना शालेय जिवनात शिस्त लावण्यासाठी उपयोगी ठरते. शालेय जिवनात सत्संगती महत्वाचे असून सद्दगुणी मित्रांचा सहवासात रहाणे दिशादर्शक असते, त्यासाठी शिस्तीच्या मार्गाने पहिले पाऊल टाका, असे आवाहन धरणगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.डी.सोनावणे यांनी केले. येथील पी.आर.हायस्कूल मध्ये आयोजित राष्ट्रीय छात्रसेना दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

विद्यार्थ्यांनी सादर केला सांस्कृतिक कार्यक्रम
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. मिलींद डहाळे होते. व्यासपीठावर पर्यवेक्षक संजय अमृतकार, डॉ.संजीवकुमार सोनवणे, कैलास वाघ, शरदकुमार बन्सी, डी.के.चौधरी, प्रशांत महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.  डॉ.संजीवकुमार सोनवणे यांनी संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन केले. राष्ट्रीय छात्रसेना स्थापना दिनानिमित्त कॅडेट्सने विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात रूपाली पाटील, सपना सुतारे, वैष्णवी माळी, ईशा सोनिचा, रोशनी शिंदे, ऐश्‍वर्या थोरात आदी विद्यार्थ्यांनी समुह नृत्य, समुहगान, राष्ट्रीय एकात्मता आदी नृत्य सादर करून उपस्थितांची प्रशंसा मिळवली.

प.रा.विद्यालयात राष्ट्रीय छात्रसेना दिवस
कार्यक्रमाचे नेटके व दिमाखदार सुत्रसंचलन चीफ ऑफीसर डी.एस.पाटील, भुमिका पाटील, महिमा खैरे यांनी तर आभार प्रदर्शन शरदकुमार बन्सी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलींद हिंगोणेकर, धनश्री माळी, रोहिणी माळी, दिपीका धनगर, भोजराज चौधरी, पियुष सोनवणे, भदाणे, यामिनी चौधरी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सांगता ’हम सब भारतीय है’ या एनसीसी गीताने झाली.