ध्वनिप्रदूषणाबाबत 5 मंडळांवर कारवाई

0

हडपसर । मुंढवा पोलिस ठाणे हद्दीतील गणपती विसर्जनाच्या बाराव्या दिवशी ध्वनिप्रदूषण चाचणी पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक सलमान पठाण तसेच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मोहन खरात, पोलिस नाईक संदीप जमदाडे या पथकाने घोरपडी भागातील विसर्जन मिरवणुकांमध्ये एकूण आठ गणेश मंडळांची ध्वनिप्रदूषण चाचणी घेतली. त्यामध्ये पाच गणेश मंडळाची ध्वनी प्रदूषण पातळीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायदा कलम पंधराप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

वीरशैव तरुण मित्रमंडळ बिडकर वस्ती (मुंढवा, डेसिबल -98.9) बोला मित्र मंडळ ट्रस्ट अमृतेश्वर मित्रमंडळ (केशवनगर, मुंढवा, डेसिबल – 98.5), सत्य ज्योत मित्र मंडळ (शिंदेवस्ती, मांजरी रोड, केशवनगर डेसिबल – 100.9), श्रीकृष्ण मित्रमंडळ सिद्धीविनायक सोसायटी (मांजरी रोड, केशवनगर, डेसिबल – 106.2), जाणता राजा गणेश मंडळ (धायरकर वस्ती, मुंढवा, डेसिबल – 97.00), या व्यतिरिक्त विसर्जनाच्या वेळी भीमनगर मुंढवा या ठिकाणी साई प्रतिष्ठान गणेश मंडळ यांच्यावर देखील ध्वनी प्रदूषण उल्लंघन केल्याबाबतची कारवाई करून ध्वनी प्रदूषण करणारे वाहन डीजे साउंड बॉक्ससह जप्त केल्याची माहिती मुंढवा पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पातरूडकर यांनी दिली.