जळगाव :जिल्ह्यात ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतागृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी वर्षामध्ये १५ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वाजवण्यास सूट जाहिर करता येते. त्यानुसार जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी ११ दिवस जाहिर केले आहेत. तर उर्वरित ४ दिवस स्थानिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी जळगाव जिल्ह्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १७ सप्टेंबर रोजी गणपती उत्सव (५ वा दिवस), १९ सप्टेंबर रोजी गणपती उत्सव (७ वा दिवस), २३ सप्टेंबर रोजी गणपती उत्सव (शेवटचा दिवस), १७ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सव (अष्टमी), १७ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सव (नवमी), ७ नोव्हेंबर रोजी दीपावली (लक्ष्मीपूजन), २० नोव्हेंबर रोजी ईद ए मिलाद, २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर रोजी वर्षअखेर या तारखेस ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक वाजवण्याकरिता सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सूट जाहिर केली अाहे. उर्वरित ४ दिवस स्थानिक परिस्थितीनुसार ऐनवेळी जाहिर करण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदूषणासंदर्भात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी. ही सुट राज्य शासनामार्फत घोषित शांतता क्षेत्राला लागू राहणार नाही. ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक वाजवण्यास सुट दिल्यानंतर प्रदुषण नियमांचे पालन करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे.