नंदगाव ग्रा.पं.मुळे वाहनधारकांची दिशाभूल थांबली !

0

जळगाव : तालुक्यातील नंदगाव येथील ग्रामपंचायतीमुळे परीसरातील वाहनधारकांची दिशाभुल थांबाली असून फक्त एका फलकामुळे नंदगाव व फुपणीला जाणार्‍या असंख्य नागरिकांची नेहमीच होणारी डोकेदुखी आता थांबली आहे. नंदगाव व फुपणी या गावात नेहमीच वाहनधारकांची वर्दळ असते.मात्र जळगावकडून नंदगावकडे जाताना फुपणी गावाचा रस्ता हा उजवीकडे तर नंदगावचा रस्ता हा डावीकडून आहे.

नंदगावपासून जवळपास अर्धा किमीवर हे दोन्ही रस्ते वेगवेगळे होतात. मात्र या दोन्ही गावांमध्ये बाहेरून येणार्‍या वाहनधारकांची नेहमीच या रस्त्यावरून दिशाभूल होत, असे व वाहनधारक गोंधळात पडून चुकून वेगवेगळ्या गावांमध्ये पोहोचत असत. मात्र नंदगावच्या सरपंच कविता सोनवणे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले व ग्रामपंचायतीने या दिशाभुल होणार्‍या रस्त्यावर नुकतेच गावांची दिशादर्शक फलक लावल्यामुळे या दोन्ही गावांमध्ये येणार्‍या वाहनधारकांची तारेवरची कसरत आता थांबली आहे.सध्या लग्नसराईचे दिवस असल्यामुळे ऐन वर्दळीच्या काळात नंदगाव ग्रामपंचायतीच्या या छोट्या मात्र महत्त्वपूर्ण कामाबाबत परीसरातील वाहनधारकांकडून कौतुक होत आहे.