पर्यवेक्षाविरोधात तक्रार दाखलसाठी पालकांची जिल्हा पेठ पोलीसात धाव
जळगाव – दहावीत शिकणाऱ्या मुलीचा गेल्या दोन वर्षांपासून त्याच आवारातील बेंडाळे महाविद्यालयातील प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थींनीकडून मानसिक त्रास दिल्याची तक्रार पर्यवेक्षकांकडे दिली. मात्र पिडीत मुलीच्याच विरोधात उभे राहून चोर असल्याचे ओरडून मारहाण केल्याचा प्रकार नंदीनीबाई वामनराव बेंडाळे मुलींच्या शाळेत घडला. याबाबत पिडीत मुलींच्या पालकांनी सकाळी जिल्हा पोलीस स्थानकात पर्यवेक्षकाविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकात ठाण मांडून होते. तर शाळेतील सर्व शिक्षकवर्ग मुलीसह पालकांना समविण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या मध्यस्थिने साध्या सोप्या भाषेत धमकी वजा समजूत दिल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदीनीबाई वामनराव बेंडाळे मुलींच्या शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थींनीस गेल्या दोन वर्षापासून त्या आवारात असलेल्या बेंडाळे महाविद्यालयातील दोन ते तीन मुलींकडून मानसीक त्रास देतात असे पिडीत मुलीने जनशक्तीशी बोलतांना सांगितले. माझ्याकडून या दोन्ही मुली कामे करवून घेत त्यांच्या मर्जीप्रमाणे वागण्यास भाग पडतात. याबाबत शाळेचे पर्यवेक्षक बी.व्ही.महाजन यांच्याकडे वारंवार दोन मुलींबाबत तक्रार दिल्या होत्या. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. दोघांमुलींच्या विरोधात तक्रार दिल्याने त्यांनी माझ्यावर पेन व पैसे चोरल्याचा आरोप केला. तर पर्यवेक्षक महाजन यांनी माझी बाजू ऐकून न घेता, मला चोर म्हणून सर्वांसमोर डोक्यावर टपल्या मारल्या. हा प्रकार मला असह्य झाल्याने पालकांना हा प्रकार शाळेतून आल्यावर सांगितला.
दरम्यान, हा प्रकार झाल्यानंतर पिडीत मुलीच्या आईवडीलांना नंदीनीबाई वामनराव बेंडाळे मुलींच्या शाळेत जावून पर्यवेक्षक बी.व्ही. महाजन यांना याचा जाब विचारला असता ‘मला आता वेळ नाही’ असे सांगून वेळ टळण्याचा प्रयत्न केला. पिडीत मुलीसह पालकांनी थेट दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलीस स्टेशन गाठले. पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांनी पर्यवेक्षक बी.व्ही. महाजन यांना जिल्हा पेठ पोलीसात बोलावण्यात आले होते.
– कोट
माझ्याकडे या मुलीबाबत 15 ते 20 मुलींची तक्रार आली, शिक्षक या नात्याने विद्यार्थीनीस समजविण्याचा प्रयत्न केला. मला नाही वाटत मी काही चुक नाही केली. आज महाविद्यालयाच्या कामात असल्यामुळे त्यांना थोड्यावेळाने भेटायला या असे सांगितले होते. मात्र पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. प्रकार शाळेतील शिक्षकांसमोर झाला आहे. ते या गोष्टीचे साक्षी आहेत.
– बी.व्ही.महाजन, पर्यवेक्षक, नंदीनीबाई बेंडाळे मुलींची शाळा