नंदुरबार। शहरातील पुन्हा 6 जण कोरोनामुक्त झाले आहेत, त्याचप्रमाणे 33 जणांचे अहवाल देखील निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळत आहे, कोरोना संसर्गमुक्त असलेल्या मध्ये पीडब्ल्यूडी कॉलनी 4, लक्ष्मीनगर 1, व जिल्हा शासकीय रुग्णालयातील एका जणांचा समावेश आहे, आतापर्यंत एकूण 53 व्यक्तींची कोरोनावर मात केली आहे, आज दिवसभरात एकाच दिवशी 6 जणांची कोरोनातून मुक्तता आणि 33 जणांचे आलेले निगेटिव्ह अहवाल या गोष्टींमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.