नंदुरबार: शहरातील तूप बाजारात एका कापड विक्रेता तरुण व्यापाऱ्याने राहत्या घरातच आत्महत्या केल्याची घटना बुधवारी, 20 रोजी सकाळी घडली. दीपेश कलेक्शन फर्म मालकाचा तो मुलगा आहे. कर्जबाजारीपणामुळे त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्या संबंधित सुसाईट नोट त्याने लिहिली असल्याचे समजते. एका तरुण व्यापाऱ्याने अशा प्रकारे जीवनयात्रा संपविल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.