नंदुरबार: कोरोना बाधित असलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील 3 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या 11 झाली असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. एकूण 66 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 63 निगेटिव्ह व 3 पॉझिटिव्ह आलेले आहेत. कोविड 19 चा संसर्ग झालेल्या त्या 3 व्यक्ती पूर्वीच्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्क साखळीतील आहेत. त्यात अक्कलकुवा येथील 23 व 48 वर्षीय महिला आणि शहादा येथील 48 वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे. या तिन्ही संशयितांना पूर्वीच क्वॉरंटईन करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली आहे.