नंदुरबार । शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी विविध माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत योजना पोहचवाव्यात, असे प्रतिपादन आ.स्मिता वाघ यांनी केले. नंदुरबार जिल्हा भाजपातर्फे पंडीत दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यविस्तार योजना अभ्यासवर्गाचे उद्घाटन आ.स्मिता वाघ यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्षा तथा खा.डॉ.हिना गावित, आ.डॉ.विजयकुमार गावित, भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, संघटक किशोर काळकर, सुनिल देवरे, प्रा.सुनिल बच्छाव, डॉ.कांतीलाल टाटीया आदी उपस्थित होते.