नंदुरबार: शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नगरपालिकेची आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. काल शुक्रवारी रात्री ९:३० ते १२:३० पर्यंत अली सहाब मोहल्ला, फकीर मोहल्ला, बालाजी वाडा, दखनी गल्ली,मणियार मोहल्ला, बिस्मिल्ला चौक, बिफ मार्केट रोड, रज्जाक पार्क, अमीन भैय्या चाळ, चिंचपाडा भिलाटी, मेहतर वस्ती, गोंधळी गल्ली, जुना बैल बाजार आदींसह 17 ठिकाण सील करण्यात आले आहे. या सर्व ठिकाणी सोडियम हायपोक्लोराईडची जंतुनाशक फवारणी करण्यात आली. कोरोना प्रार्दुभाव टाळण्यासाठी 17 ठिकाण सील करण्यात आले असून 14 ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. पहाटे 5 वाजेपर्यंत हे काम सुरू होते. दरम्यान ग्रीन झोनमध्ये असलेल्या नंदुरबारला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने झोन बदलणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नंदुरबार शहरात आजपासून तीन दिवस कर्फ्यु लावण्यात आला आहे.