नंदुरबारमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव: रजाळे येथील एक जण पॉझिटिव्ह

0

नंदुरबार: दोन दिवसांपूर्वी नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. त्यामुळे नंदुरबारकरांना दिलासा मिळाला होता. मात्र आता नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा एक रुग्ण आढळून आल्याने नंदुरबारकरांच्या चिंतेत भर पडली आहे. नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील 66 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसताच तपासणी करावी आणि बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनाला द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.