नंदुरबारला महिलेचे 16 हजार रुपयांचे दागिने लांबविले

0

नंदुरबार । अनोळखी व्यक्तीने महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडील 16 हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना 28 रोजी नंदुरबारातील तहसील कार्यालय परिसरात घडली. नवापूर येथील इस्लामपूरा भागातील रुखसानाबी हुसेन शहा या कामानिमित्त 28 रोजी नंदुरबारात आल्या होत्या. तहसील कार्याल परिसरात त्यांना एक अनोळखी व्यक्ती भेटला. त्याने महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडील पर्स लांबविली. पर्समध्ये 14 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व दोन हजार रुपये रोख होते.

ही बाब महिलेच्या लक्षात आल्यावर तोर्पयत संबंधित व्यक्ती पसार झाला होता. महिलेने रात्री उशिरा पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून उपनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास फौजदार पाटील करत आहे.