नंदुरबारात तरुणाचा मृत्यू ; जमावाची दगडफेक

0

तरुणांमध्ये वाद उफाळल्याने बर्फ फोडण्याच्या टोचाने केला वार

नंदुरबार– मित्रांमध्ये झालेल्या भांडणात आरोपींनी बर्फ फोडण्याच्या टोचाने वार केल्याने शहरातील तरुणाचा मृत्यू झाल्याने शहरातील साक्री नाका भागात मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास तणाव निर्माण झाला होता. यानंतर संतप्त झालेल्या एका गटाच्या जमावाने परीसरात दगडफेक केली तसेच रात्री शहर बंदचे आवाहन केल्याने व्यापारीवर्गात मोठी घबराट पसरली. रवींद्र सोमा सोनवणे (25) असे मयत तरुणाचे नाव असून त्याचे वडील पोलीस कर्मचारी आहेत. परीस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन साक्री नाका परीसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अक्षय्य तृतीयेच्या पूर्व संध्येलाच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.