नंदुरबारात राज्यस्तरीय वारकरी संमेलनाला सुरुवात !

0

खा.हिना गावीत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन

नंदुरबार- आजपासून नंदुरबारात अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हा कमिटीच्यावतीने माळीवाडा परिसरात राज्यस्तरीय वारकरी संमेलन सुरु झाले आहे. खासदार हिना गावित यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. भव्य कीर्तन महोत्सव, ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रास्ताविक वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज माळी यांनी केले.

व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प प्रकाश महाराज बोधले, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, उद्योगपती मनोज रघुवंशी, यशोदाताई जायखेडकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे, नगरसेवक आनंदा माळी, भिला खोरी, ह.भ. प अनिल महाराज वाळवे, ह.भ. प किशोर महाराज प्रकाशेकर,ह.भ. प विजय महाराज जाधव, ह.भ.प छोटू महाराज, डॉ.तुषार सनसे, कृषिभूषण पाटीलभाऊ माळी, नगरसेवक चारुदत्त कळवनकर, गजेंद्र शिंपी, प्रविण गुरव, विजय माळी आदी उपस्थित होते.

ज्ञानेश्वरी ग्रंथाची मिरवणूक
संमेलनाला सुरुवात होण्याच्या अगोदर माळीवाडा परिसरातून सकाळी ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली.यावेळी भक्तांनी विविध भक्ती गीते सादर केली. टाळ- मृदंगाच्या गजरात जय हरी विठ्ठलाचा जयघोष करण्यात आल्याने परिसरात उत्साह संचारलेला होता.महिला भाविक भक्तांनी फुगड्या खेळल्या. वारकरी संमेलनाचे संयोजन माळी समाजाने केली आहे.