नंदुरबार – येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी एस पाटील होते तर अध्यक्षस्थानी प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हे होते.
यावेळी प्रमुख वक्ते डॉ.पाटील यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना ग्राहकांचे महत्त्व व अधिकार यावर प्रकाशझोत टाकला. तसेच विविध उदाहरण देऊन ग्राहक किती जागृत राहिला पाहिजे याचे महत्त्व पटवून दिले. यावेळी ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, तालुका सचिव जितेंद्र जाधव, श्रॉफ कॉलेजचे प्रा,.राजेंद्र शिंदे, प्रा. प्रशांत बागुल, प्रा.नितीन देवरे, प्रा.नेहा पाटील, प्रा.विद्या श्रीगणेश, प्रा.दिनेश देवरे, प्रा. कमलेश आहिरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर गणेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश पाटील यांनी मानले.