नंदुरबारात सेना ताकदीनिशी लढणार – खा.संजय राऊत

0

नंदुरबार : जिल्ह्यातील एक लोकसभा व चार विधानसभा निवडणुका शिवसेना पूर्ण ताकदीनिशी लढविणार आहे. त्यासाठी सेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचे दोन मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख खा. संजय राऊत यांनी नंदुरबार येथे पत्रकार परिषदेत दिली, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाचपणी करण्यासाठी खा,संजय राऊत हे आज नंदुरबार जिल्यात आले होते, यावेळी त्यांनी सेनेच्या पदाधिकारी व जेष्ठ कार्यकर्त्यांशी संवाद साधून आढावा घेतला, त्यानंतर नंदुरबार येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाचपणी करण्यासाठी जिल्हा निहाय दौरे केले जात आहेत. पूर्वीपेक्षा शिवसेनेला मानणारा वर्ग आता नंदुरबार जिल्ह्यात वाढत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील सेनेचा झेंडा फडकत आहे,त्यामुळे या आदिवासी बहुल जिल्ह्यात आता लोकसभा एक व विधान सभेच्या चारही जागा शिवसेना लढणार आहे,गेल्या चार वर्षांत पुला खालून बरेचसे पाणी वाहून गेल्याने भाजपशी युती होणे आता शक्य नाही. असे सांगून ते म्हणाले की ज्यांचा साठी नंदुरबार जिल्हा हा शेवटचा जिल्हा वाटत असेल पण शिवसेनेसाठी हा जिल्हा प्रथम पसंतीचा राहणार आहे, उद्धव ठाकरे यांनी देखील या नंदुरबार जिल्याकडे वयक्तिक लक्ष घातल्याने आगामी काळात शिवसेनेत खूपच बदल दिसतील,निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या दोन सभा नंदुरबार जिल्ह्यात घेण्याचे नियोजन केले जाणार आहे, असेही खा. संजय राऊत यांनी सांगितले, यावेळी जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे,आमस्या पाडवी आदी उपस्थित होते.