नंदुरबारात १९ लाखांचा महु फुलांचा साठा जप्त

0

नंदुरबार-दारूबंदी विभागाच्या भरारी पथकाने प्रकाशा येथे सोमवारी सकाळी छापा टाकून ट्रक सह सुमारे 18 लाख 80000 रुपयाचा महु फुलांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

मध्य प्रदेश येथील निवाली येथून एम पी 43 एच 15 10 या क्रमांकाच्या ट्रकमधून महू फुलांचा बेकायदेशीर साठा वाहतूक केला जात असल्याची खबर दारूबंदी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार दारूबंदी विभागाचे दुय्यम निरीक्षक डी.आर.ठाकूर, मनोज संबोधी, विवेक धांडे, मोहन पवार यांच्या पथकाने प्रकाशा येथील हॉटेलआशिष समोर उभ्या असलेल्या त्या क्रमांकाच्या ट्रकची तपासणी केली, त्यात 425 पोती म्हणजे एकूण 17 हजार किलो असा बेकायदेशीर फुलांचा साठा आढळून आला, मध्यप्रदेश मधील निवाली येथून तो महाराष्ट्रात आणला गेला होता, याप्रकरणी ट्रक चालक इमरान युसुफ बेग व क्लिनर हर सिंह भायला बारीया या दोघांना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सहा लाख 80 हजार रुपयाचा महू फुलांचा साठा व बारा लाख किंमतीचा ट्रक असा एकूण 18 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, दारु गाळण्यासाठी वापरण्यात येणारा हा महू फुलांचा साठा कोणत्या व्यापाऱ्याकडे नेला जात होता याची चौकशी सुरू आहे. सोमवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास प्रकाशा गावात ही कारवाई करण्यात आली आहे.