नंदुरबार जिल्हा परिषदेत सत्ता बदलाच्या हालचाली

0

नंदुरबार। जिल्हा परिषदेत सत्ता बदलाच्या हालचाली सुरू झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर दोन दिग्गज नेत्याची बैठक सुरू आहे. या बैठकीत काय चर्चा होते ही बाब गुप्त असली तरी येत्या काही दिवसात जिल्हा परिषदेच्या सत्ता बदलाचा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी नंदुरबार जिल्हा परिषदेत विकास कामावरून राडा होऊ लागला आहे, त्याचा विस्फोट होण्याची चिन्हे दिसत आहे, आज होत असलेल्या दोन नेत्यांच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.