नंदुरबार जिल्ह्यातून आतापर्यत १५० बसद्वारे ३२८० प्रवासी वाहतूक

0

नवापूर: कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यात व परराज्यात विविध ठिकाणी अडकलेले मजूर, नागरिक तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी नवापूर सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अनेक बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातून १५० बसद्वारे ३२८०प्रवासी वाहतूक करण्यात आली असून नवापूरमधून ९२ बसेसमधून २०२८ प्रवासी रवाना केले आहे. विशेष म्हणजे नवापूर शहरातुन सर्वाधिक बसेस सोडण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. तहसीलदार उल्हास देवरे व टिम नवापूरचे काम खुपच चांगले व नियोजनपुर्ण असल्याचे दिसुन आले आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे.
मजुरांना बसमधुन पाठविण्यासाठी सोशल डिस्टन ठेवुन व मास्क लावुन रवाना करण्यात येत आहे. तहसीलदार उल्हास देवरे यांनी पदभार सांभाळल्यापासुन त्यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांशी योग्य समन्वयाने नवापूर तालुक्यासाठी परफेक्ट नियोजन केल्याने यापुर्वी आलेल्या तक्रारी कमी झाल्या. ग्रामीण भागातील रेशन दुकानावर जाऊन धान्य वाटपाचे योग्य नियोजन केले. काही ठिकाणी कारवाई केली.त्यामुळे येणाऱ्या तक्रारी बंद झाल्या. योग्यवेळी सीमा बंदी केली.विलीगीकरण कक्षात सुविधा निर्माण केल्या.तहसीलदार उल्हार देवरे यांनी कमी कालावधीत आपल्या अभ्यासु कामाची छाप पाडली आहे. कमी बोलुन जास्त काम करण्याची हातोटी सर्वाना आवडली. शांत व संयम ठेवुन सर्वाचे प्रश्न सोडवुन समाधान करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसुन आला आहे. महिन्याभरापासुन २४ तास काम ते नवापूरसाठी करत आहेत. आपल्या परिवारापासुन दुर राहुन शासकीय विश्रामगृहात ते राहत आहे. रात्री उशिरापर्यत ते काम करत असल्याचे दिसुन आले.त्यामुळे नवापूर तालुक्याला अशाच तहसीलदाराची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केलीे. उल्हास देवरे यांनी नवापूर शहरातुन मजुरांसाठी बसेस सोडण्याचे उत्तम नियोजन आगार प्रमुख राजेंद्र अहिरे व त्यांच्या टिमचा सहकार्यातुन केले. सर्वाधिक बसेस नवापूर शहरातुन सोडण्यात आल्याने मोठी सोय झाली आहे. समाधान व्यक्त होत आहे. नवापूरकरांचे ही चांगले सहकार्य मिळत आहे. रणरणत्या उन्हात महामार्गावरून पायपीट करून घराकडे निघालेल्या परप्रांतीयांचे हाल थांबण्यासाठी एसटी देवदुत बनली आहे. एसटी महामंडळातर्फे फिजिकल डिस्टन्सचे तंतोतंत पालन करून महामार्गावरून पायी जाणार्‍या मजुरांना त्यांच्या सीमेवर सोडले जात आहे. त्यासाठी महसूल यंत्रणेसह पोलीस प्रशासनाची मदत होत आहे.