नंदुरबार जिल्ह्यात नवापूरात सर्वाधिक होम क्वारंटाईन व्यक्ती 

0

नवापूर (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात सर्वाधिक होम क्वारंटाईनचे 277 रुग्ण आहेत. विदेशातून आलेल्या चार लोकांना नवापूर तालुका क्वारंटाईन कक्षात मंगळवारी ठेवण्यात आले होते. महसूल विभागाने प्राथमिक सुविधा उपलब्ध करून न दिल्याने विदेशातून आले चार व्यक्ती व त्यांचा संपर्कातील 14 परिवारातील सदस्य कक्षातून घरी सोडण्यात आल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विदेशातून आले चार व्यक्ती घराबाहेर जरी निघत नसतील परंतू परिवारातील सदस्य बाहेर निघत असल्याने भितीचे निर्माण झाले आहे. यासंदर्भात नंदुरबार जिल्हाधिकारी डाॅ राजेंद भारूड यांनी कठोर पावले उचलून योग्य कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.चार व्यक्तीची विदेशातून आलेल्या हिस्टरी असताना नवापूर होम क्वारंटाईन कक्षामधून कसे सोडले हा महत्त्वाचा विषय शहरात चर्चिला जात आहे.

राज्याबाहेरील राज्यातील पुणे,मुंबई,नाशिक या कोरोना प्रभावित क्षेत्रातील बाहेरगावाहून आलेले तालुक्यातील एकूण 277 व्यक्तीचा समावेश आहे.पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 277 तालुक्यातील लोकांना त्यांच्या राहत्या घरी 14 दिवसाचा होम क्वारंटाईनमध्ये मध्ये ठेवण्यात आलेले आहे.नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील होम क्वारंटाईनचा 277 चा आकडा हा सर्वाधिक जरी असला तरी भीती बाळगण्याचे कारण नाही. नवापूर वगळता नंदुरबार जिल्ह्यात 30 लोकांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. यातून 10 व्यक्तीचे रक्ताचे नमुने पुणे येथे पाठण्यात आले होते. सुदैवाने निगेटिव्ह आले आहे.त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही. संपूर्ण व्यक्ती 14 दिवसाच्या आरोग्य विभागाचा निगराणीत ठेवण्यात आले होते. गटविकास अधिकारी यांनी सांगितले नंदुरबार जिल्ह्यात एकही कोरोना पॉझिटिव पेशंट नाही.त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.जनजागृती करावी घराबाहेर पडू नये गरज भासल्या मास्क लावून घराच्या बाहेर पडावे. अन्यथा घरातच राहावे.देशात 21 दिवसांची संचारबंदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेली आहे.त्याचे काटेकोरपणे पालन करावे असे आव्हान तालुका प्रशासनाने केले आहे. परंतू तालुका प्रशासनाचे पालन करताना दिसत नाही.

नवापूर शहरात संचारबंदी

पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत तहसीलदार सुनिता ज-हाड,गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर,नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी या संचार बंदीचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांनी घरातच राहावे असे आवाहन केले आहे. अत्यावश्यक किराणा दुकान, जनरल स्टोअर्स हे दुपार दुपारी बारा पर्यंत खुले करण्यात आले होते त्यानंतर संपूर्ण शहरात किराणा दुकान, भाजीपाला विक्रेते इतर दुकाने सर्व दुकाने बंद करण्यात आलेली आहे.गावात सध्या तरी शुकशुकाट दिसून येत आहे.कोणीही बाहेर निघू नये अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील असे आहवान पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी केली आहे. सर्व नागरिक घरांमध्ये थांबून देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या 21 दिवसाच्या संचारबंदीचे पालन करावे असे सांगण्यात आले.