नंदुरबार: जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.
शहादा तालुक्यातील 62 वर्षाच्या पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण पूर्वीच्याच प्रतिबंधित क्षेत्रातील असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहादा तालुक्यातील हिंगणे येथील एक (51 वर्षीय पुरुष) रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना 26 मे रोजी मृत्यू झाला होता. त्याचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. उपचारादरम्यान आजाराची लक्षणे दिसत असल्याने त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना चाचणीसाठी दुसऱ्यांदा पाठविण्यात आला होता. दरम्यान 26 रोजी त्याचा मृत्यू झाला.आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 31 इतर व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 32 जण पॉझिटिव्ह आले आहेत, त्यातील तीन जणांचा मृत्यू झाला असून
19 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत, सध्या 10 जण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत अशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.