नंदुरबार। काठोबा देवस्थान परिसरातील शेतांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असल्याने शेतकऱ्यांमधे कमालीची भीती निर्माण झाली आहे. या बिबट्याने ठेलारी कुटुंबीयांचा एका घोड्याचा फडश्या पाडला आहे. नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील काठोबा देवाच्या टेकडी परिसरात बिबट्याचे दर्शन होऊ लागले आहे. त्यामुळे शेतात काम करणारे शेतकरी भयभीत झाले असून धुमाकूळ घालून प्राण्यांना भक्ष्य करणाऱ्या बिबट्या चा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे.