नंदुरबार परिक्षा केंद्रांवर कॉपींचा महापूर

0

नंदुरबार । येथील परीक्षा केंद्रांवर सुरू झालेल्या इयत्ता दहावीच्या मराठी विषयाच्या पहिल्याच पेपरला कॉप्याचा महापूर दिसून आला. परिक्षर्थी विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्यासाठी शिक्षक कर्मचारी वर्गाने देखिल भूमिका निभावली, बंदोबस्ताला असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांचीही हतबलता दिसून आली आहे. माध्यमिक व उच्चमध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीच्या परीक्षांना 1 मार्च पासून सुरुवात झाली आहे, काल पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर होता. माय मराठीच्या या पेपरला देखील कॉपीचा महापूर दिसून आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. पेपरच्या दरम्यान झेरॉक्स मशीनबंद ठेवण्याचे आदेश असले तरी काही ठिकाणी झेरॉक्स सेंटर बिनधास्त सुरू होते. याच झेरॉक्समधून उत्तर पत्रिका बाहेर पडून त्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे दिसून आले. कॉपी घेण्यासाठी पालकांची व परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मित्रांची तोबा गर्दी झाली होती. परीक्षा हॉल मधेच कॉपी पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे कॉपी मुक्त अभियानाचा नंदुरबारला फज्जा उडाला आहे. बंदोबस्तला असलेल्या पोलिस कर्मचारी यांच्या समोरच कॉपी बहाद्दर हॉलमध्ये घुसून कॉपी पुरवितांना दिसून आले. यावेळी पोलिस सांची हतबलता दिसून आली.