आदिवासी विद्यार्थी सेनेचा आक्रमक पवित्रा
नंदुरबार- शहराचे प्रकल्प तथा उपविभागीय अधिकारी वानमंती यांच्या वाहनावर देखील हल्ला झाल्याची घटना नंदुरबारात घडली. या घटनेने अधिकार्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. 6 ऑगस्ट रोजी आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी राज्यव्यापी आंदोलन केले. वसतीगृहात जेवण मिळावे, डीबीटी योजना रद्द करावी यासाठी आंदोलन करण्यात आली तर नंदुरबार येथील प्रकल्प कार्यालयावर देखील निदर्शने सुरू होती. त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेली आदिवासी विद्यार्थी सेना अचानक आक्रमक झाली. संतप्त विद्यार्थ्यांनी प्रकल्प तथा प्रांताधिकारी वानमंती यांच्या गाडीची नासधूस केली. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या असून नुकसान करण्यात आल्या. नंदुरबारच्या खासदार हिना गावीत यांच्या वाहनावर धुळे येथील आंदोलकांनी हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच महिला अधिकारी असलेल्या नंदुरबार प्रकल्प अधिकार्यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे,