नंदुरबार। गणेशोत्सव म्हटला म्हणजे ढोल ताशांचा अन,संभळ तुतारीचा निनाद… या वाद्याच्या ठेक्यावर तरुणाईचे पाऊल आपोआप थिरकायला लागतात. उत्सवात नाचणारे तरुण ,ढोल वाजणारा ढोलक्या ही मंडळी सार्यांच्या नजरेत भरतात. मात्र या वाद्यांना जो आकार देतो…घडवितो तो कलाकार मात्र कायम दुर्लक्षितच असतो. नंदुरबार, धुळे,जळगाव जिल्ह्यासह नजीकच्या गुजरात, मध्यप्रदेश राज्यातील सुमारे आठशे गणेश मंडळांना ढोल,ताशे,संभळ आदी वाद्ये बनवून पुरविणारे नंदुरबार येथील मोची बंधू यांची कलाकारी काही औरच आहे. गणेशोत्सव अवघ्या पंधरा दिवसावर येऊन ठेपल्याने या उत्सवाच्या तयारीसाठी गणेश मंडळांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ढोल ताशे बुक करण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे.
महागाईचा खरेदीवर परिणाम नाही
त्यांचे वडील दगडू मोची यांनी या ढोल ताशे बनविण्यावर इतकी पकड ठेवली आहे की, कोणत्याही मंडळाचे कार्यकर्ते त्यांच्याकडून वाद्य घेतल्याशिवाय राहत नाही. ढोल ताशे,डफ,हे वाद्य घ्यायचं म्हटले म्हणजे दगडू मोची यांचं नाव घेण्यात येते. आता त्यांची जागा त्यांच्या तिघ मुलांनी घेतली आहे. चारशे रुपयांपासून तर सातहजार रुपयांप्रर्यंत ढोलच्या किंमती आहेत. तर दीडशे पासून तर तेराशे रुपयांपर्येंत ताशांच्या किमती आहेत. यावर्षी जीएसटीमुळे किंमती वाढल्या असल्याततरी काही परिणाम झाला नसल्याचे मोची यांनी सांगितले. मोची यांनी बनविलेले वाद्य सुरत, बारडोली, नवसारी,सोनगड, राजपिपाला, चलथान, या गुजरात राज्यातील मंडळे, तसेच, सेंधवा, पानसेमल, खेतीया ,मालेगाव,धुळे, आदी भागात जातात. कच्चा माल आणून स्वतः ढोल ताशे तिघ भाऊ बनवित असतात. यामुळे लोकांची पसंती माहीत असल्याने भावना वाढली आहे. मोची बंधूंनी तयार करून दिलेला ढोल ,ताशे नंदुरबार शहरातील मानाचे दादा व बाबा गणपतीच्या मिरवणूकीत वाजवून निनादात असतात. याचे समाधान मिळते, असे मोची बंधू सांगितले.
खरेदीसाठी दुकानात जत्रा
वाद्य घेण्यासाठी मंगळ बाजारातील मुकेश मोची यांच्या दुकानात जणू यात्राच भरलेली असते. ढोल,ताशे,संभळ,डफ,टिंगरी,चोप,घेण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते हजेरी लावतांना दिसत आहेत. या कार्यकर्त्यांना ढोलचा दर्जा,आवाजातला फरक आदी गोष्टी मुकेश मोची,व त्यांचे बंधू घनश्याम मोची, विक्की मोची हे सांगतात. याविषयी मुकेश मोची सांगितले की पन्नास वर्षापासून वडिलोपार्जित व्यवसाय आहे.