नंदुरबार येथे तरूणाचा गळफास

0

नंदुरबार । शहरातील गांधीनगर भागात राहणार्‍या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, गांधीनगरमध्ये राहणारा विवेक वामनराव चौधरी (वय-44) याने 23 जानेवारीच्या रात्री 8 ते 11 वाजेच्या दरम्यान राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण मात्र अजून समजलेले नाही. याबाबत वासुदेव भिका चौधरी यांनी शहर पोलिसात खबर दिली आहे, त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.