नवापूर: तालुक्यातील मोठे कडवान येथे जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत नंदुरबार रस्ता ते कडवान जि.प. शाळापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे कामाचा शुभारंभ आ. शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते श्रीफळ फोडुन नुकताच करण्यात आला.यावेळी पं.स. सभापती रतिलाल कोकणी, पं.स. सदस्य यशोदा पाडवी, मोठे कडवानचे सरपंच बंधु वळवी, उपसरपंच जेहऱ्या वसावे,भांगरपाडाचे सरपंच जयंत पाडवी, ग्रा.पं. सदस्य सखाराम गावित,अमरसिंग वसावे, ग्रा.पं. सदस्य प्रमिला गावित,लिलाबाई गावित, माजी पं.स. सदस्य राम कोकणी,रायपुरचे सरपंच ईश्वर गावित, ग्रामसेवक सुभाष पवार, पोलीस पाटील राकेश वसावे आदी उपस्थित होते.
नंदुरबार रस्ता ते मोठे कडवान जिल्हा परिषद शाळापर्यंत हा डांबरी रस्ता १५ लाख रुपये खर्चीक असुन या कामाला सुरुवात झाली आहे. रस्त्याचे काम पावसा अगोदर पुर्ण झाले पाहिजे. जेणेे करुन ग्रामस्थांना अडचण येऊन नये, अशा सुचना आ. शिरीषकुमार नाईक यांनी दिल्या.
तलावाचे गाळ काढणे कामाची पाहणी
तालुक्यातील मोठे कडवान येथे महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत गाव तलावाचे गाळ काढणे काम सुरु असुन या कामाची आ. शिरीषकुमार नाईक यांनी पाहणी केली. गाव तलावाचे काम गावकरी यांनी स्वत: उभे राहुन करुन घ्यावे, जेणेकरुन तलावात जास्त काळ पाणी कसे साचुन राहील यांची दक्षता घ्या. गावातील काही समस्या व अडचणी असतील त्या सांगुन त्या दुर कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
नवापूर तालुक्यात महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे कामे जवळपास सर्व सुरु झाले आहे. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.