नंदुरबार। माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे नेते शरद गावीत यांच्या पुत्रासह दोन तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात रात्रीची गस्त घालणारे पोलिस उपनिरीक्षक पी.पी.सोनवणे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून शासकीय कामात अडथळा आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी गौरव शरद गावीत, अविनाश गावीत या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. तिसरा फरार असल्याचे पोलसांनी सांगितले. सोमवारी रात्री 11 वाजेच्या दरम्यान स्टेशन रस्त्यावरील टापु परिसरात घडली.