नंदुरबार शहराच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी 9.37 कोटी मंजूर

0

नंदुरबार । राज्य शासनाने नंदुरबार शहरासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचा रूपये 9.37 कोटीचा प्रकल्प मंजूर केला आहे. देशात इंदौर शहराचा क्रमांक 1 चे स्वच्छ शहर म्हणून निवड झाली असून नंदुरबार शहरातील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प इंदौर येथील मे. इको. प्रो. इन्व्हायमेंटल सर्व्हिसेस या संस्थेने तयार केलेला आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी नंदुरबार नगरपरिषदेकडे जवळपास 10 हेक्टर जमीन उपलब्ध आहे. या मंजूर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात या संपुर्ण जमिनीस संरक्षक भिंत बांधली जाईल. शहरातील निर्माण होणारा कचरा ओला व सुका स्वतंत्रपणे संकलनासाठी 20 चारचाकी घंटागाडी देखील उपलब्ध होतील. घनकचरा व्यवस्थापन अद्यावत पध्दतीने करण्यासाठी शेडचे बांधकाम करुन खतप्रकल्प व प्लास्टीक पुर्नवापर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या व्यवस्थापनाच्या ठिकाणी स्वतंत्र पाणी पुरवठा वाहीणी टाकण्यात येवून 50 हजार लि. क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात येईल. तसेच शहरातील व्यावसायिक भागात 100 लिटर क्षमतेचे अत्याधुनिक कचराबिन्स ठेवण्यात येणार आहेत.