नंदुरबार। शहरासह परिसरात गेल्या दोन दिवसापासून आकाशात ऊन सावलीचा खेळ सुरू असून सार्यांनाच आता पावसाची प्रतिक्षा लागली आहे. प्रचंड प्रमाणात होणारा उकाळा आणि सायंकाळी आकाशात जमणारे काळे ढगे निसर्गाच्या या बदलत्या वातावरणाने पावसाची चाहूल द्यायला सुरूवात केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यापासून सूर्य आग ओक असल्याने उष्ण वातावरण तयार झाले आहे.
या काळात शेतकर्यांनी शेतीची सर्वच कामे पूर्ण करून ठेवली आहेत. आता प्रतिक्षा सर्वच कामे पूर्ण करून ठेवली आहेत. आता प्रतिक्षा आहे ती वरूणराजाच्या आगमनाची. केरळमध्ये मान्सून येवून धडकल्याने नंदुरबार जिल्ह्यातील शेतकर्यांच्या आशा देखील पल्लवीत झाल्या आहेत. दोन दिवसापासून आकाशात ऊन सावलीचा खेळ सुरू झाल्याने पहिल्या पावसाची आस सार्यांनाच लागली आहे. रोज सायंकाळी होणारा ढगांचा गडगडाट अन् विजांच्या लखलखाटामुळे आज ना उद्या तो येणारच या आशेने शेतकर्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.