नंदुरबार। शहरासह परीसरात काल रात्री पहिल्या पावसाने हजेरी लावून दिलासा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यामुळे सार्यांनाच पावसाची प्रतीक्षा लागली होती. शेतकर्यांनी देखील मान्सूनपूर्व शेतीची कामे पूर्ण करून ठेवली आहेत. आता प्रतिक्षा होती ती केवळ पावसाची.
गुरुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास ढगांचा गडगडाटासह पावसाने हजेरी लावल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे. वीस मिनिटापर्यंत पाऊस सुरू राहिल्याने सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. असे असले तरी अजून दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या तीन महिन्यापासून नंदुरबार शहरातील नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. मात्र काही प्रमाणात पडलेल्या पावसाने दिलासा मिळाला आहे.