नंदूरबार येथे आरोग्य शिबिर घेऊन डेंग्यू विषयक प्रबोधन

0

नंदुरबार – येथील दसरा दसरा मैदान येथे सनातन संस्थाच्या वतीने आरोग्य शिबिर घेऊन डेंग्यू विषयक प्रबोधन करण्यात आले.  समाजसाहाय्य, राष्ट्रजागरण आणि धर्मजागृती याविषयीचे उद्दिष्ट घेऊन याचे ध्येय ठेवून सनातन संस्था ठाणे न्यास कार्यरत आहे. त्याअंतर्गत सातत्याने गरीब व कष्टकरी महिलांना साडी वाटप करणे, आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे तसेच विविध विषयांवर प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणे या स्वरूपाचे उपक्रम राबवत असते. त्याअंतर्गतच काल 26 नोव्हेंबर 2018 रोजी नंदुरबार शहरातील दसेरा मैदान येथे सनातन संस्था ठाणे न्यासाच्या वतीने आरोग्य शिबीर घेण्यात आले. त्यात सनातन संस्था ठाणे न्यासाच्या वतीने डॉ. रजनी नटावदकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यात त्यांनी डेंग्यू विषक माहिती देत प्रतिबंधक ऊपाययोजना सांगितल्या. डेंग्यूची लक्षणे, तो कशा मुळे होतो व त्यावर उपाय योजना कशी करावी, याविषयी मार्गदर्शन केले. परिसरातील महिलांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.