नऊ गोळ्या लागल्यानंतरही चेतनकुमार यांची मृत्यूला हुलकावणी

0

नवी दिल्ली । जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे हल्ले सुरूच आहेत. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला भारतीय सुरक्षा दलाचे जवान चोख प्रत्युत्तर देत असतात. अशाच प्रकारे 14 फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांशी लढताना सीआरपीएपचे कमांडंट चेतन कुमार यांना तब्बल 9 गोळ्या लागल्या होत्या. दहशतवाद्यांच्या 9 गोळ्या लागल्यानंतरही चेतन कुमार लढत राहीले आणि त्यांनी दहशताद्यांचा खात्मा केला. यानंतर चेतन कुमार यांना तात्काळ उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्यूलाही हुलकावणी देणार्‍या  चेतन कुमार यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. जम्मू-काश्मीरच्या बांदीपुरात येथे 14 फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांशी लढताना चेतनकुमार चिता यांना तब्बल 9 गोळ्या लागल्या होत्या. यापैकी एक गोळी त्यांच्या डोक्यातही घुसली होती. गंभीर जखमी झाले असतानाही चेतन कुमार यांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांच्या या कारवाईचा सर्वांनाच अभिमान आहे. नऊ गोळ्या लागल्यानंतरही चेतन कुमार हे सुखरूप आहेत हा एक चमत्कारच म्हणावं लागेल. साधारणत: दीड महिन्यांनंतर चेतनकुमार कोमातून बाहेर आले असून आता त्यांची प्रकृती सुधारली आहे. चेतनकुमार यांना सर्व समजत असून ते व्यवस्थित बोलतही आहेत. यामुळे सर्व तपासणीनंतर चेतनकुमार यांना आता डिस्चार्ज देता येईल असे डॉक्टरांनी म्हटले आहे. सीआरपीएफचे कमांडिंग ऑफिसर चेतन कुमार यांनी दहशतवाद्यांचा कमांडर अबू हारिश याचा खात्मा केला होता. यावेळी गंभीर जखमी झालेल्या चेतन कुमार यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. चेतन कुमार यांनी ज्या प्रकारे दहशतवाद्यांचा खात्मा केला त्याचप्रमाणे त्यांनी मृत्यूवर मात केली आहे. नऊ गोळ्या लागूनही चेतन कुमार यांचा आयुष्यासाठी संघर्ष सुरू होता. त्यांच्या सांध्यामध्ये फ्रॅक्चर आणि डोळ्याला दुखापत झाली होती. एम्स रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते.