बुलडाणा – खामगाव तालुक्यात एका नऊ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या महिन्यात या चिमुकलीवर गावातीलच नराधमाने अत्याचार केला.
या घटनेने मुलीचे कुटुंबीय हादरले आहेत. त्यांनी मोहन वळोदे या नराधमा विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मुलीच्या जबाबावरून या नराधमा विरुद्ध बलात्काराचा तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पीडितेला पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. अनेकदा तिला रुग्णालयातही उपचारार्थ नेण्यात आले होते. मात्र, उपचारांचा काही उपयोग होत नसल्याने डॉक्टरांकडे या चिमुकलीने आपली आपबिती कथन केली. हे ऐकून डॉक्टरांनाही धक्काच बसला. तिला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले.