नक्षलवादी पहाडसिंग पोलिसांच्या शरणी

0

छत्तीसगड: गेल्या १४ वर्षांपासून गडचिरोली आणि छत्तीसगडमधील नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रीय असलेला जहाल नक्षलवादी पहाड सिंगने अखेर शरणागती पत्करली आहे. छत्तीसगड पोलिसांना पहाडसिंग शरण गेला असून त्याच्यावर सुमारे १ कोटी रुपयांचे इनाम होते. २००३ मध्ये नक्षलवादी संघटनेत सामील झालेल्या पहाडसिंगने गेल्या १४ वर्षांत अनेकांना ठार केले असून त्याच्यावर ६० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

पहाडसिंग यांनी गुन्हेगारी विश्वात दहशत माजवली आहे. सरकार पहाडसिंगला शोधण्यासाठी अथक परिश्रम घेत होते.