रायपूर : छत्तीसगडमधील तर्रेम गावात मंगळवारी सुरक्षा रक्षकांकडून नक्षलवाद्यांचा कट उद्ध्वस्त करण्यात आला. या भागातून सुरक्षा रक्षकांनी 10 किलोग्रॅम आणि 18 किलोग्रॅमचे दोन बॉम्ब जप्त केलेत.
नक्षलवाद्यांकडून हे दोन बॉम्ब लावण्यात आले होते. या भागात अजून काही बॉम्ब लावले आहेत काय याचा शोध सुरक्षा रक्षकांकडून घेतला जात होता. रस्त्यावरून जाणार्या पोलिसांना तसेच सुरक्षा रक्षकांना मारण्याच्या उद्देशाने हे बॉम्ब लावण्यात आले होते.