नगरच्या अतुलला ‘सारंगश्री 2017’चा किताब

0

सारंगखेडा । चेतक फेस्टीवल अंतर्गत सारंग श्री 2017 ही शरीर सौष्ठव स्पर्धा नुकीतच पार पडली. 55, 60, 65,70, 75 व 80 या वजन गटात या स्पर्धा झाली असून 6 गटातून 9 स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले. सारंगश्री 2017 चा किताब अहमदनगर येथील अतुल खडमकर ’टायटल’ याला देण्यात आला. रोख 21000 हजार रूपये प्रमाणपत्र व ट्रॉफी प्रदान करण्यात आली.या स्पर्धेत एकुण 95 स्पर्धकांनी सहभागी नोंदविला. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर आदी जिल्ह्यातून बॉडी बील्डर सहभागी झाले होते.

9 स्पर्धकांचा विविध पारितोषिकांनी गौरव
एकुण 9 स्पर्धकांना यावेळी चेतक फेस्टीवलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते गौरविण्यात आले. बेस्ट पोझर मुद्दसर पटेल (जळगाव) 5000 रूपये रोख प्रमाणपत्र व ट्रॉफी तसेच मोस्ट इम्प्रुव्ह 3000 रूपये व प्रमाणपत्र ट्रॉफी जितेंद्र गौरी जळगाव यास मिळाले. पंच म्हणुन जितेंद्र भिंगार दिले, मधुकर गायकवाड, मोहन चव्हाण, मनोज गायकवाड, अनिल गोरे, राहुल शिरसाठ, मयुर दरदले, शब्बीर अन्सारी, कैलास रणसिंग, सतिष रासकर, दिपक होतोळे, नासिर बागवान, गोविंद गोरे, नागराज पाटील, दिपक पाटील, प्रविण दशळे, धनंजय पाटील, गोपाळ गायकवाड, गोपीनाथ रोडे, राहूल अमृतकर यांनी काम पाहीले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेतक फेस्टीवलच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिनेश कोयंडे यांनी केले.